esakal | पळशीत बैलगाडी शर्यत घेणाऱ्या 13 जणांवर गुन्हा; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Bullock Cart Race

सध्या राज्यभरात बैलगाडी शर्यतीवर बंदी असून शर्यतीचे आयोजन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या काही दिवसांत सातारा जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीवर कारवाई करण्यात आली आहे.

पळशीत बैलगाडी शर्यत घेणाऱ्या 13 जणांवर गुन्हा; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (सातारा) : पळशी (ता. खंडाळा) येथील दत्तनगर भागातील डोंगरात मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यत (Bullock Cart Race) घेणाऱ्या आयोजकांसह एकूण १३ जणांविरुध्द शिरवळ पोलिस ठाण्यात (Shirwal Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन वाहनांसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (A Case Registered Against 13 Organizers Of Bullock Cart Race At Palashi Satara Crime News)

शिरवळचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश वळवी (Sub-Inspector Police Ramesh Valvi), राजू अहिरराव, हवालदार विनोद पवार, दत्तात्रय धायगुडे, महिला पोलिस लता पाडवी यांनी घटनास्थळी छापा टाकला. याप्रकरणी आशिष मोहिते, आकाश गावडे, करन भरगुडे, ओंकार भरगुडे, प्रवीण भरगुडे, शुभम भरगुडे, जनार्दन कोळपे, पिनू भरगुडे या आयोजकांसह धायरेश्वर पाटील, आकाश गावडे, विशाल बाटे, वसंत बाटे, संकेत बाटे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: धक्कादायक! खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह जाळला; खंडाळ्यात खळबळ

त्यामध्ये दोन वाहनांसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हवालदार संतोष मठपती तपास करीत आहे. सध्या राज्यभरात बैलगाडी शर्यतीवर बंदी असून शर्यतीचे आयोजन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या काही दिवसात सातारा जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीवर कारवाई करण्यात आली असून अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शर्यती सुरु करण्याबाबत अनेकांनी याचिका दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ती याचिक फेटाळून लावली आहे.

A Case Registered Against 13 Organizers Of Bullock Cart Race At Palashi Satara Crime News

loading image
go to top