esakal | धक्कादायक! खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह जाळला; खंडाळ्यात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime

सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास खंबाटकी घाटात महिलेचा मृतदेह नाल्यात असल्याची माहिती ट्रक चालकाने खंडाळा पोलिसांना दिली.

धक्कादायक! खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह जाळला; खंडाळ्यात खळबळ

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (सातारा) : खंडाळा गावच्या हद्दीत खंबाटकी घाटाच्या (Khambatki Ghat) दुसऱ्या वळणावर नाल्यात अंदाजे 18 ते 25 वर्ष वयाच्या अज्ञात विवाहित महिलेचा (Women) मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. (The Dead Body Of Unidentified Woman Was Burnt In Khambatki Ghat Satara Crime News)

याबाबत खंडाळा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास खंबाटकी घाटात महिलेचा मृतदेह नाल्यात असल्याची माहिती ट्रक चालकाने खंडाळा पोलिसांना दिली. खंडाळा पोलिस ठाण्याच्या (Khandala Police Station) पोलिस निरीक्षक महेश इंगळे (Police Inspector Mahesh Ingle), महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार, हवालदार पिसाळ, प्रशांत धुमाळ, सचिन वीर, बालाजी वडगावे, विठ्ठल पवार, चालक थोरवे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: VIDEO : गळ्यात कवड्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे वासुदेव करतोय कोरोनाविषयी जागृती

सडपातळ बांधा असेलल्या विवाहित महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेला होता. तिच्या पायात चांदीची जोडवी व साखळीचे पैंजण होते. चेहरा पूर्ण जळालेला होता. अज्ञात मारेकऱ्यांनी या महिलेला मारून या ठिकाणी टाकून पेटवून दिल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. खंडाळा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश इंगळे करीत आहेत.

The Dead Body Of Unidentified Woman Was Burnt In Khambatki Ghat Satara Crime News

loading image
go to top