esakal | लोणंद-शिरवळ मार्गावरील अपघातात पुण्याचा एकजण ठार
sakal

बोलून बातमी शोधा

लोणंद-शिरवळ मार्गावरील अपघातात पुण्याचा एकजण ठार

लोणंद-शिरवळ मार्गावरील अपघातात पुण्याचा एकजण ठार

sakal_logo
By
- रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : लोणंद-शिरवळ रस्त्यावर अंदोरी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत वाद्योशी खिंडीत मोटारसायकल खड्डयात आपटून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार झाला आहे. लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती आशी की, हातमुशी ता. भोर जि. पुणे येथील शिवाजी रघुनाथ उफाळे (वय ४५) हे काल (ता. २) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास होंडा डिलक्स मोटार सायकल क्रमांक (एमएच -१२ एनडी -९३७१) वरून लोणंद ते शिरवळ रस्त्यावरुन जात असताना वाघोशी खिंडीत आल्यावर रस्त्यावर असणाऱ्या खड्यामध्ये त्यांची मोटारसायकल आपटल्याने त्यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजुला पडल्याने ते गंभीर जखमी झाले.

हेही वाचा: वारकरी सांप्रदायातील काही मंडळी मानधनापासून 'वंचित'

त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्त स्त्राव होवून ते मृत्यू पावले. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत त्यांचा मुलगा ओमकार उफाळे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात खबर दिली असून लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हावलदार पवार हे अधिक तपास करत आहेत.

loading image
go to top