पुणे पदवीधर निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंपेक्षा 17 उमेदवारांना मिळाली कमी मते

सिद्धार्थ लाटकर
Friday, 4 December 2020

पुणे विभागात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पाचही जिल्ह्यातून पदवीधर मतदारसंघासाठी दाेन लाख 47 हजार 50 मतदान झाले.

सातारा : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी बाजी मारली. या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील पाेवई नाक्यावर फटाके फाेडले. दरम्यान या निवडणूकीत साता-यातील अभिजीत बिचुकले यांनी प्रथम पसंतीची 56 मते मिळाली आहेत.

मंगळवारी (ता. एक डिसेंबर) या निवडणूकीसाठी मतदान झाले. त्यानंतर गुरुवारी (ता. 3) सकाळी आठला पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे मतमोजणीस प्रारंभ झाला. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार उभे होते. पुणे विभागात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पाचही जिल्ह्यातून पदवीधर मतदारसंघासाठी दाेन लाख 47 हजार 50 मतदान झाले.
सातारा : राष्ट्रवादी पून्हाचा गजर लागला घुमू

या निवडणुकीत 62 पैकी 31 उमेदवारांना दाेन अंकी मते मिळाली आहेत. बिग बाॅस फेम साता-यातील अभिजीत बिचुकले हे देखील उमेदवार हाेते. त्यांना निवडणुकीत प्रथम पसंतीची 56 मते मिळाली आहेत. त्यांच्या पेक्षा 17 उमेदवारांना 50 पेक्षा कमी मतदान झालेले आहे.

पदवीधर मधून लाड विजयी, महाविकास आघाडीचा भाजपला दे धक्का


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijeet Bichukale Pune Graduate Constituency Election Result Satara News