अबब! सहा किलो वजनाचे सेंद्रिय पध्दतीचे रताळ, भाटकीत किमया

सल्लाउद्दीन चोपदार
Saturday, 24 October 2020

म्हसवडपासून पाच किलोमीटर अंतरावर भाटकी हे गाव सुमारे 1200 लोकवस्तीचे आहे. येथील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक शेती करतात. सध्या विजयादशमीनिमित्त दुर्गा उत्सवातील उपवास सुरू असल्याने उपवासात रताळे उखडून खाण्यासाठी ग्राहकांतून मोठी मागणी असते.

म्हसवड (जि. सातारा) : भाटकी (ता. माण) येथील वसंत शिर्के यांनी आपल्या दहा गुंठे शेतात सेंद्रिय पध्दतीने रताळे पीक घेतले आहे. त्यात एका रताळाचे वजन तब्बल पाच ते सहा किलो आढळून आले आहेत. 

म्हसवडपासून पाच किलोमीटर अंतरावर भाटकी हे गाव सुमारे 1200 लोकवस्तीचे आहे. येथील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक शेती करतात. त्यांनी आपल्या दहा गुंठे शेतात सेंद्रिय पध्दतीने रताळाचे पीक घेतले आहे. सध्या विजयादशमीनिमित्त दुर्गा उत्सवातील उपवास सुरू असल्याने उपवासात रताळे उखडून खाण्यासाठी ग्राहकांतून मोठी मागणी असते. 

काटेवाडीत फुलल्या झेंडूच्या बागा; दस-यात फुलांना मोठी मागणी

या पार्श्‍वभूमीवर त्यांनी रताळे काढणी सुरू केली असता त्यांना भरघोस उत्पादन मिळते आहे. काही रताळी तर अक्षरशः पाच ते सहा किलो वजनाची आढळून आली आहेत. यावर्षी या भागात वेळोवेळी झालेल्या पावसामुळे या पिकास पोषक हवामान झाले असल्यामुळे भरघोस पीक उत्पादन हाती लागले असून, दहा गुंठे शेतात आपल्याला किमान 60 हजार उत्पन्न मिळेल, अशी आशा श्री. शिर्के यांनी व्यक्त केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abundant Production Of Yam Crop At Bhatki Satara News