esakal | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर एका युवकाने महाबळेश्‍वर, वाई तालुक्याच्या परिसरात अत्याचार केल्याची तक्रार वाई पोलिस (Police) ठाण्यात दाखल झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी संशयित राजेंद्र महादेव (Rajendra mahadev) रांजणे (वय ३२) याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले.

हेही वाचा: Kolhapur : वैयक्तिक माहिती देऊ नका

याबाबत माहिती अशी, की तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील संशयित युवकाने महाबळेश्‍वर व राहत्या घराच्या परिसरात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल या घटनेची माहिती देण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या आईने वाई पोलिस ठाणे गाठले अन् पोलिस निरीक्षक भरणे यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून श्री. भरणे यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन यातील संशयित असलेला राजेंद्र रांजणे यास तत्काळ अटक केली. तपास बाळासाहेब भरणे करीत आहेत.

loading image
go to top