कऱ्हाड ढेबेवाडी रस्त्यावरील अपघातात माजी सरपंचाच्या वडिलांचे निधन

कऱ्हाड ढेबेवाडी रस्त्यावरील अपघातात माजी सरपंचाच्या वडिलांचे निधन

विंग (जि.सातारा) : भरदाव वेगाने आलेल्या टेंपोची धडक बसून झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कऱ्हाड - ढेबेवाडी रस्त्यावर कोळे - घारेवाडी दरम्यान आज (मंगळवार) दुपारी ही घटना घडली. शिंगणवाडी (ता. कऱ्हाड) येथील विलास शामराव शिंगण (वय 66) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. टेंपो चालकावर कऱ्हाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस व ग्रामस्थांची माहितीवरून - शिंगण हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी घारेवाडी जवळच्या खडकवस्ती परिसरात गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास कऱ्हाडहून ढेबेवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या टेपोने (एमएच 50-5578) त्यांना धडक दिली. धडकेत डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले. घटनेनंतर टेंपोचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र माहिती मिळताच घटनास्थळी असलेल्या युवकांनी पाटलाग करून त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

जिलेबीचा गोडवा, कोरोनामुळे कडवा... आला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

पाटण तालुक्यातील मानेगाव येथील संतोष जनार्धन माने या टेंपो चालकावर कऱ्हाड पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. अपघात विभागाचे हवालदार डी. बी. राजे व एन. एस. भाकले यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास ते करत आहेत. मृत शिंगण शिंगणवाडीचे माजी सरपंच व विद्यामान सदस्य रविंद्र शिंगण यांचे वडील हाेत. त्या गाव व परिसरातून त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com