गाड्यांचा ताफा थांबवून गृहराज्यमंत्री धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Summary

गाडीतून उतरुन देसाईंनी धावत अपघातस्थळी जात अपघात झालेल्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

कऱ्हाड (सातारा) : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे काल मुंबईवरुन साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) खोपोली येथे अपघात झाला. ते पाहताच मंत्री देसाई यांनी वाहनांचा ताफा थांबवत तत्परतेने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावत गेले. नातेवाईकांची आस्थेवाईकपणे त्यांनी चौकशी करुन पोलिसांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या.

मंत्री देसाई हे तत्पर व धाडसी असून मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मंत्री देसाई यांचा ताफा मुंबईवरुन साताऱ्याकडे येत होता. त्यादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे अपघात झाल्याचे मंत्री देसाईंच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ चालकांना गाड्यांचा ताफा थांबवून बाजूला घेण्यास सांगितले. गाडीतून उतरुन त्यांनी धावत अपघातस्थळी जात अपघात झालेल्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या नागरिकांनी देसाई 'साहेब मानलं तुम्हाला' म्हणत त्यांच्या या आस्थेवाईकपणाचं कौतुक केलं.

Shambhuraj Desai
Political News : अवघ्या 40 दिवसांत दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश

अपघातामध्ये कुणाला गंभीर दुखापत वगैरे झाली आहे का? याची खात्री करुन त्यांनी तातडीनं स्वत: हायवे पोलीस विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन अपघातग्रस्त कुटुंबीयांना तातडीनं आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. अपघात झालेले वाहन हे संबंधित यंत्रणेमार्फत मुंबईकडे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री देसाईंमुळं अपघात झालेल्या कुटुंबीयांना तात्काळ आवश्यक ती मदत झाल्याने अपघातग्रस्त कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com