Satara : भरचौकात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर झाडल्या गोळ्या; हल्ल्यात आप्पा मांढरे गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

साताऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.

Satara : भरचौकात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर झाडल्या गोळ्या; हल्ल्यात आप्पा मांढरे गंभीर जखमी

सातारा : साताऱ्यातील राजवाडा परिसरात बुधवारी मध्यरात्री एकावर अज्ञाताकडून गोळीबार झाला. या गोळीबारात आप्पा मांढरे जखमी झाले आहेत. मांढरे यांच्या पोटात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात (Satara District Hospital) दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा: PHOTO : शिवप्रताप दिनी मोठी कारवाई; अफजलखानाच्या कबरीजवळची अतिक्रमणं हटवली

राजवाड्यावर रात्री अकराच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्या पोटात अज्ञात व्यक्तीनं दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं साताऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा: Pratapgad : अफजलखानाचं उदात्तीकरण! कबरीला मुंबईतून मोगऱ्याचा हार, बॉम्बस्फोटातील आरोपीनंही केला होता मुक्काम

हा वाद पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, साताऱ्यातील राजवाडा परिसरामध्ये खासदार उदयनराजे समर्थक आप्पा मांढरे हे बोलत उभे राहिले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहेत. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलीस व सातारा शहर पोलिसांना (Satara Police) मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. जखमी मांढरे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सातारा शहराची नाकाबंदी सुद्धा केली आहे.

हेही वाचा: कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?