Adani Maharashtra Project Controversy
esakal
-सचिन शिंदे
कराड : राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची अनिवार्य पूर्वपरवानगी न घेताच पाटण तालुक्यातील तारळे परिसरात सुरू असलेल्या अदानी समूहाच्या तारळे पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्टचे सर्व कामकाज तात्काळ थांबवण्याचे स्पष्ट आदेश वनविभागाने दिले (Adani Tarale project stop work order Maharashtra) आहेत. प्रचलित वन व वन्यजीव कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. नलवडे यांनी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.