
-विलास खबाले
कोळे: आगाशिव डोंगर आणि पठाराची पर्यटकांना भुरळ पडू लागली आहे. हिरवाईने नटलेला निसर्गरम्य परिसर आणि बुद्धकालीन लेण्यांतून प्राचीन सांस्कृतिक दर्शन घडत असल्याने पर्यटकांची पावले तिकडे वळू लागली आहेत. श्रावणात निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक भेट देत आहेत. सोमवारी गर्दीचा ओघ वाढू लागला आहे.