पतसंस्‍था फसवणूकप्रकरणी आगवणेंना पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agawan in police custody in case of credit institution fraud

पतसंस्‍था फसवणूकप्रकरणी आगवणेंना पोलिस कोठडी

फलटण शहर - स्वराज पतसंस्था फसवणूकप्रकरणी दिगंबर रोहिदास आगवणे यांना आज फलटण शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खोटी कागदपत्रे, जमिनीची मालकी हक्क नसताना ती किमती व मालकी असल्याचे भासवून आगवणे यांनी येथील स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेतून सुमारे एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. कर्ज वसुलीसाठी पतसंस्थेचे अधिकारी गेल्यानंतर त्यांना, तसेच सर्व संचालकांवर ॲट्रॉसिटीची तक्रार करण्याची धमकी आगवणे यांनी दिली होती. त्यावर पतसंस्थेच्या शाखा अधिकाऱ्यांनी ११ एप्रिल २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती

त्यानुसार आगवणे यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता; परंतु आगवणे यांनी सातारा येथील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. या अटकपूर्व जामिनाची मुदत ता. २५ जुलैपर्यंत होती. मुदत संपल्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच पोलिसांनी दिगंबर आगवणे यांना आज अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.