Sheti Shala in Wathar: कार्यक्रमानंतर रुंद सरी वरंबा पद्धतीने घेतलेल्या प्लॉटला भेट देण्यात आली. यामध्ये बीबीएफ व पारंपरिक सरी-पद्धतीतील तुलनात्मक फरक प्रत्यक्ष दाखविण्यात आला, कीटक व रोग ओळख प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली.
Farmers at Wathar Station attend a live demo on green gram cultivation as part of an Agriculture Department initiative under the sheti shala program.Sakal
वाठार स्टेशन : कृषी विभाग विभागाच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन तंत्रज्ञान (आत्मा) अंतर्गत वाठार स्टेशन येथे शेतीशाळेचे आयोजन केले होते. यावेळी घेवडा (राजमा) पिकाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निराकरण करण्यात आले.