मालेगावप्रमाणे कोरेगाववरही ठेवणार लक्ष: मंत्री भुसे

Agriculture Minister Bhuse
Agriculture Minister Bhuse sakal
Summary

मुंबईमध्ये बसून उंटावर शेळ्या हाकत, पोपटपंची करत काडीने मलम लावण्याचे इतरांचे काम असल्याचा टोलाही मंत्र्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

कोरेगाव (सातारा): सेंद्रिय शेतीतील उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठीची यंत्रणा उभारण्याची व लागेल त्याला ठिबक संच देण्याची घोषणा कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली. आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहण्याची आणि मालेगावप्रमाणेच कोरेगाववरही लक्ष ठेवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. दरम्यान, मुंबईमध्ये बसून उंटावर शेळ्या हाकत, पोपटपंची करत काडीने मलम लावण्याचे इतरांचे काम असल्याचा टोलाही मंत्र्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

Agriculture Minister Bhuse
कोरेगाव भीमा प्रकरणावर नवीन पुस्तक;पाहा व्हिडिओ

किन्हई (ता. कोरेगाव) येथे डॉ. गजाननराव चिवटे यांच्या ऑरगेनिक फार्मवर सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार महेश शिंदे, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, शिवाजीराव महाडिक, विठ्ठलराव कदम, सुनील खत्री, हणमंतराव जगदाळे, राहुल प्र. बर्गे, राजाभाऊ बर्गे, विभागीय सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके उपस्थित होते. श्री. भुसे म्हणाले, ‘‘विकेल ते पिकेल हे धोरण अवलंबले जाणार आहे. त्यासाठी येत्या चार महिन्यांत प्रारूप तयार होईल. केमिकल न वापरण्याचा कायदा तयार करता येईल का, यावर राज्य शासन विचार करेल. कोरेगाव मतदारसंघात आले संशोधन केंद्र उभारण्याच्या मागणीवर तसेच परदेशातून येणाऱ्या कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याच्या मागणीवर कार्यवाही केली जाईल. कृषी विभागाच्या ३० टक्के योजना महिलांसाठी राखून ठेवल्या आहेत. या योजनांच्या लाभासाठी सात-बारा उताऱ्यावर महिलांचे नाव लावावे.’’

Agriculture Minister Bhuse
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा एकमेकांशी संबंध नाही, हायकोर्टात दावा

आमदार महेश शिंदे म्हणाले, ‘‘वांगणा प्रकल्पाचे पाणी भाडळे तलावात सोडण्याबाबतचे प्रेझेंटेशन मी मुख्यमंत्र्यांपुढे केले आहे. कोरोनामुळे हा विषय मागे पडल्याने मंत्री भुसे यांनी पुढाकार घेऊन यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पुन्हा बैठक घेण्याचे नियोजन करावे. मत्स्यशेतीसाठी मतदारसंघात १४० शेततळ्यांचे काम सुरू केले आहे. मागच्या काळात नारळ फोडून फोडून जनता वाहू लागली. मी नारळ फोडण्याचे बंद करून प्रत्यक्षात काम करत आहे. सध्या उसाच्या प्रश्नावरून जिरवाजिरवी सुरू आहे. मात्र, या सर्वांचीच मी जिरवणार आहे. आपल्यालाही कारखाना काढायचा आहे; परंतु त्याची घोषणा मी योग्यवेळी करेन.’’ श्री. बानुगडे-पाटील, प्रा. अनिल बोधे, अशोक चिवटे, चांगदेव मोरे यांचीही भाषणे झाली.

Agriculture Minister Bhuse
कोरेगाव पार्क येथे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी; पाहा व्हिडिओ

राज्यपालांना सुबुद्धी मिळो

शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांच्या नावाच्या मागे आमदार ही उपाधी लागावी, अशी मनोमन इच्छा आहे. त्यामुळे राज्यपालांना सुबुद्धी मिळो आणि बानुगडे-पाटील यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा होवो, अशी मार्मिक टिप्पणी मंत्री भुसे यांनी यावेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com