

Pangri’s Ajay Dadas Shines at Ironman Goa, Competing Against 1,300 Global Athletes”
Sakal
बिजवडी : गोवा येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन या स्पर्धेत पांगरी (ता. माण) येथील अजय दडस यांनी यश संपादन केले आहे. शारीरिक क्षमतेची आणि मानसिक संयमाची परीक्षा घेणाऱ्या आयर्नमॅन या स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी झाले होते. दडस हे सध्या वडोदरा (गुजरात) विमानतळ येथे असिस्टंट या पदावर कार्यरत आहेत. ही नोकरी सांभाळत त्यांनी फिटनेससाठी वेळ काढत स्पर्धा पूर्ण केली.