
सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास देश पातळीवरील साखर उद्योगाशी संलग्न असलेल्या भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेने सर्वोत्कृष्ट साखर कारखाना राष्ट्रीय पातळीवरील (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे. एक लाख रुपये रोख, ट्रॉफी व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या १८ जुलैला कोल्हापूर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी दिली आहे.