esakal | संपूर्ण महाराष्ट्राला माहितीय मी कसा आहे; 'जरंडेश्वर'वरुन अजितदादांचा सोमय्यांवर निशाणा I Ajit Pawar
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, की मी नियमानं वागणारा माणूस आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला माहितीय मी कसा आहे : अजित पवार

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : मी नियमानं वागणारा माणूस आहे, त्यामुळं जरंडेश्वर कारखान्याबाबत (Jarandeshwar Sugar Factory) आरोप करणाऱ्यांविषयी मला काहीही बोलायचं नाही, असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चांगल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात साखर कारखाने द्यावेत, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा: राष्ट्रवादी पराभवाचा वचपा काढणार? दादांमुळे कार्यकर्ते 'चार्ज'

खटावातील मेळाव्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी जरंडेश्वर साखर कारखान्यावर आरोप केले जात आहेत, याविषयी विचारले असता, पवार म्हणाले, असल्या लोकांविषयी मला काहीही बोलायचं नाही, सर्व काही नियमानुसार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मी नियमानं वागणारा माणूस आहे, असे त्यांनी स्पष्ट करत अधिक बोलणं टाळलं. तसेच खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केलेल्या खोचक टीकेवर ही अजित पवार यांनी अधिक बोलणं टाळत मला त्या मुद्द्यावर बोलायचं नाही, असं सांगत मला विकासाच्या मुद्यावर बोलायचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: एमआयएम मुस्लिमांसाठी 'यम', तर ओवैसी 'जीना पार्ट टू'

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर असे विचारले असता, अजित पवार म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मकरंद पाटील, शशिकांत शिंदे हे एकत्र बसून निर्णय घेतील. स्थानिक पातळीवर आम्ही लक्ष घालत नाही, स्थानिक नेत्यावर जबाबदारी सोपवली जाते. आम्ही लोकसभा विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

loading image
go to top