esakal | एमआयएम मुस्लिमांसाठी 'यम', तर ओवैसी 'जीना पार्ट टू'; काँग्रेसकडून खरपूस समाचार I Asaduddin 0waisi
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin 0waisi

आठ वर्षांपासून मुस्लिमांच्या विरोधात वातावरण करण्याची चाल केंद्राच्या समर्थकांकडून सुरू आहे.

एमआयएम मुस्लिमांसाठी 'यम', तर ओवैसी 'जीना पार्ट टू'

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : आठ वर्षांपासून मुस्लिमांच्या (Muslim Community) विरोधात वातावरण करण्याची चाल केंद्राच्या समर्थकांकडून सुरू आहे. त्याचा पाया 'एमआयएम पक्षा'ने (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) घातलाय. त्यामुळे एमआयएम मुस्लिमांसाठी यम आहे, अशी सणसणीत टीका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष झाकिर पठाण (Congress leader Zakir Pathan) यांनी केलीय. निवडणुका आल्या की, मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी (Barrister Asaduddin 0waisi) बाहेर पडतात आणि कॉंग्रस (Congress) विरोधात विषारी प्रचार करून भाजपला फायद्या मिळवून देतात, असेही पठाण यांनी स्पष्ट केले.

पठाण पुढे म्हणाले, सत्तर वर्षांत काँग्रेसनं काय दिलं व पुरोगामी विचारांची काँग्रेस नाही, असा अपप्रचार करणारे ओवैसी यांच्या बापजाद्यांनी कॉंग्रेस बरोबर सत्ता का भोगली आहे, त्याचे उत्तर द्यावे. तुम्ही 2013 पर्यंत याच काँग्रेससोबत सत्ता का भोगली, याचाही खुलासा करावा. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपच्या इशाऱ्यावर नाचत मुस्लिमांच्या खऱ्या शत्रुंच्या विरोधात न लढता त्यांच्या पायात लोटांगण घालणाऱ्या ओवैसींची नीती आता पश्चिम बंगालच्या मुस्लिमांनी देशातील मुस्लिमांसमोर उघड केलीय. त्यामुळे ओवैसींची कुटनीती मुस्लिम समाजाने ओळखली आहे, त्यामुळे एमआयएमच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला मुस्लिम समाज बळी पडणार नाही.

हेही वाचा: शिवसेनेला कमी लेखण्याची चूक करु नका : उदय सामंत

मुस्लिम समाज हा भावनिक आहे, तो भोळा आहे. त्याच्या भावनेशी खेळ करण्याचा थांबवा, नाहीतर मुस्लिम समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम समाजाला भावनिक करून दिशाभूल करणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांनी जाणीव ठेवावी, की काँग्रेसच्या राजवटीत लाखोंच्या संख्येने महिला रस्त्यावर आंदोलनाला कधी उतरल्या नाहीत. एनआरसीसाठी महिलांना शाहीन बाग आंदोलन करावं लागलं नाही. मुस्लिम बांधवांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवणारा पक्ष काँग्रेस पक्ष आहे. पाच टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टानं ग्राह्य धरलं, ते मुस्लिम समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण काँग्रेसनेच आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. बॅरिस्टर ओवैसी हे बॅरिस्टर जीना पार्ट टू आहेत, हे आता मुस्लिम समाजाने ओळखायला सुरुवात केलीय, असा खरपूस समाचारही पठाण यांनी घेतला.

हेही वाचा: राष्ट्रवादी पराभवाचा वचपा काढणार? दादांमुळे कार्यकर्ते 'चार्ज'

loading image
go to top