

Ajit Pawar strengthens his hold in Satara; senior leaders Prabhakar Deshmukh and Sunil Mane expected to join NCP soon.
Sakal
सातारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पुन्हा जोरदार मुसंडी मारण्यासाठी सरसावलेल्या राष्ट्रवादीच्या गळाला दोन नेते लागले आहेत. बहुचर्चित माणचे नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.