- हेमंत पवार
कऱ्हाड : पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याबाबत सरकारने यापुर्वी प्रयत्न केले आहेत. अजुनही काही प्रश्न आहेत त्याबाबतीत अधिवेशन संपल्यावर सातारा, पुणे किंवा मुंबईत बैठक घेतली जाईल. कोयनासह अन्य धरणग्रस्तांचे म्हणने एेकुन घेवुन जेथे पुनर्वसनाचे प्रश्न राहिले आहेत त्यांना न्याय देण्याचे प्रयत्न महायुतीचे सरकार करेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. वांग-मराठवाडी धरणग्रस्तांसंदर्भात प्रशासनाकडुन काही चुक झाली असेल तर ती दुरुस्त करु असेही त्यांनी स्पष्ट केले.