शेतकऱ्यांची बॅंक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घट्ट नाळ होती. बॅंकेशी संबंधित कोणतेही निर्णय घेताना ते शेतकऱ्यांच्या हिताकडे अधिक लक्ष देत असत. - राजेंद्र सरकाळे, सीईओ, जिल्हा बँक.क्रीडा चळवळीचा आधारस्तंभ हरपला; अजित पवार यांच्या निधनाने क्रीडाक्षेत्र हळहळले.क्रीडा चळवळीचा आधारस्तंभ हरपलाकर्जमाफी होत असताना सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी यामध्ये तांत्रिकदृष्ट्या बसत नव्हते. त्यावेळी अजितदादांनी स्वत: यामध्ये लक्ष घालून ११ हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४० कोटी रुपये मिळवून दिले, तसेच सचिवांना जिल्हा बॅंकेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेतही दादांनी मोठा निर्णय घेतला. त्यामुळे ज्यावेळी ते साताऱ्यात येत असत. त्या- त्या वेळी जिल्हा बॅंकेला भेट देऊन संचालकांशी चर्चा करत असत. त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यावर विशेष भर देत असत. जिल्हा बॅंकेच्या शेतकरी सभासदांवर प्रेम करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे..जिल्हा बॅंक २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे शक्य झाले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत बॅंकेवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. बॅंकेत राजकारण बाजूला ठेऊन सर्व संचालक एकत्रितपणे निर्णय घेतात. या संचालकांना उपमुख्यमंत्री पवार यांचे मार्गदर्शन, सहकार्य कायम मिळत राहिले. ज्या -ज्यावेळी बॅंकेशी संबंधित विषय येईल, त्या -त्या वेळी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व संचालक अजित पवारांचे मार्गदर्शन घेत असत. यातून बॅंकेने अनेक कसोट्यातून बाहेर पडून राज्यात आणि देशात आपले नाव निर्माण केले..कर्जमाफी केल्यानंतर जे शेतकरी वेळेत कर्जपरतफेड करतात. त्यांना काहीतरी मिळावे, अशी मागणी जिल्हा बॅंकेच्या सर्व संचालक मंडळाने अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावर पवार यांनी यामध्ये निर्णय घेत थकबाकीदारांसोबतच वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मदत करण्याची भूमिका घेतली. त्यानुसार ५० हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय झाला. या निर्णयाचा जिल्हा बॅंकेच्या सभासदांना मोठा फायदा झाला. त्यातून तब्बल ६२५ कोटी बॅंकेला मिळाले, तसेच कर्जमाफीत ऊस उत्पादक शेतकरी बसत नव्हते. ही बाब बॅंकेच्या संचालकांनी अजितदादांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने निर्णय घेत ऊस उत्पादकांना कर्जमाफीत समाविष्ट करून घेतले. त्याचा जिल्ह्यातील ११ हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला. त्यातून बॅंकेला ४० कोटी रुपये मिळाले..Ajit Pawar: दादा आणि साताऱ्याचं अतूट नातं!.सचिवांचे केडर २००८ मध्ये स्थापन झाले. तेव्हापासून सचिवांना जिल्हा बॅंकेत समावून घेण्याची प्रक्रिया अडखळली होती. याबाबत बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांच्यासह संचालकांनी दादांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे सचिवांना बॅंकेशी जोडण्याचा निर्णय झाला, तसेच जिल्हा बॅंकेच्या सभासदांची शेअर्स रक्कम २० हजारांहून ५० हजार करण्यासाठीही निर्णय घेतानाही अजितदादांची महत्त्वाची भूमिका राहिली. देवस्थान इनाम जमिनींना कर्ज वितरण करण्याचा शासन निर्णय घेणे आदी विविध निर्णय त्यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहेत. जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळ आणि सभासद शेतकऱ्यांचे हित पाहणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत; पण जिल्हा बॅंकेच्या संचालक व सभासदांना त्यांची आठवण सातत्याने होत राहील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.