esakal | कालेटेक पंचायतीवर माजी मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व; उपसरपंचपदी कॉंग्रेसचे यादव बिनविरोध

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat
कालेटेक पंचायतीवर माजी मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व; उपसरपंचपदी कॉंग्रेसचे यादव बिनविरोध
sakal_logo
By
सचिन मोहिते

काले (सातारा) : कालेटेक ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर युवा नेते अजित यादव (Ajit Yadav) यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. जयवंत यादव यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदाची कालेटेक ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक झाली. (Ajit Yadav Unopposed As Deputy Panch Of Kaletek Gram Panchayat)

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक बाळासाहेब भोसले यांनी काम पाहिले. कालेटेक ग्रामपंचायतीवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) व कॉंग्रेसचे (National Congress Party) जिल्हा सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता आहे. यादव यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

आता खाेट बाेललात तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल हाेणार

निवडीबद्दल यादव यांचे कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, पै. नानासाहेब पाटील, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे, सरपंच पंडितराव हरदास, माजी सरपंच बाळासाहेब जावीर, माजी उपसरपंच जयवंत यादव, राहुल यादव आदींनी अभिनंदन केले.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Ajit Yadav Unopposed As Deputy Panch Of Kaletek Gram Panchayat