रुग्णवाहिकेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची 15 लाखांच्या निधीस तातडीची मान्यता : पृथ्वीराज चव्हाण

राजेंद्र ननावरे
Wednesday, 23 September 2020

आमदार चव्हाण यांनी 21 ऑगस्टला रुग्णवाहिकेसाठी निधी मंजूर करण्याकरिता शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 15 लाखांच्या निधीस तातडीने मान्यता दिली. त्याची अंमलबजावणी होऊन ही रुग्णवाहिका पालिकेच्या सेवेत समाविष्ठ झाली. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात नेण्याकरिता सोय उपलब्ध झाली आहे. 

मलकापूर (जि. सातारा) : कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता शहरासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची आवश्‍यकता होती. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका मिळण्याबाबत केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिऱ्यांनी 15 लाख निधी मंजूर केला होता. त्या निधीतून अत्याधुनिक रुग्णवाहिका पालिकेच्या सेवेत दाखल झाली. त्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाले. 

सध्या कऱ्हाड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. बाधित रुग्णांना वेळेत उपचार करणे आवश्‍यक असल्यामुळे अशा रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणेसाठी रुग्णवाहिकांची गरज आहे. सध्या शहरात उपलब्ध रुग्ण्वाहिकांवरील ताण विचारात घेता मलकापूरसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची आवश्‍यकता होती. ही गरज ओळखून पालिकेने रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून 15 लाखांचा निधी मिळण्याची विनंती केली होती. 

सातारा-जावळी असा दुजाभाव मी कधीच केला नाही : शिवेंद्रसिंहराजे

आमदार चव्हाण यांनी 21 ऑगस्टला रुग्णवाहिकेसाठी निधी मंजूर करण्याकरिता शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 15 लाखांच्या निधीस तातडीने मान्यता दिली. त्याची अंमलबजावणी होऊन ही रुग्णवाहिका पालिकेच्या सेवेत समाविष्ठ झाली. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात नेण्याकरिता सोय उपलब्ध झाली आहे. त्या सर्व सोयींनीयुक्त रुग्णवाहिकेचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

प्रतिसरकार चळवळीतील शेवटचा दुवा निखळला; सोपानराव घोरपडे यांचे निधन
 
आमदार चव्हाण यांनी रुग्णवाहिकेची चावी नगराध्यक्षा नीलम येडगे व प्रभारी मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे दिली. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, सागर जाधव, महिला व बालकल्याण सभापती आनंदी शिंदे, उपसभापती कमल कुराडे, नगरसेविका शकुंतला शिंगण, माधुरी पवार, नंदा भोसले, आनंदराव सुतार, हणमंत शिंगण, गणेश चव्हाण, शहाजी पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आंधळी धरण तुडुंब; बिदाल, दहिवडीकरांना मोठा दिलासा

पालिकेला आणखी चार ऑक्‍सिजन मशिन 
यावेळी केएसटी कन्स्ट्रक्‍शनचे संचालक किशोरकुमार साळुंखे, अरविंद खबाले, जीवन तवटे यांच्याकडून 2, गजानन नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव शिंदे यांच्याकडून 1 व कोयना वसाहत औद्योगिक वसाहतीमधील व्यावसायिकांकडून 1 अशा चार ऑक्‍सिजन कॉन्सट्रेटर मशिन आमदार चव्हाण यांच्या हस्ते पालिकेला देण्यात आल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance Was Provided To Malkapur From MLA Prithviraj Chavan's Local Development Fund Satara News