
-जयभीम कांबळे
विद्यानगर : गोवारे (ता. कऱ्हाड) येथील अमोल अशोक पाटील याने स्पर्धा परीक्षेला सामोरे जात खडतर प्रवासातून अभ्यासाच्या सातत्याने त्याची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी निवड झाली. आई गृहिणी अन् वडील शेतकरी असताना अमोलने स्वतःच्या जिद्दीवर अभियांत्रिकीची पदवी मिळवली.