
-तानाजी पवार
वहागाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयने दररोज महामार्ग किंवा एक्स्प्रेस वेवर मोटारीने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी वार्षिक फास्टॅग पास उपलब्ध केले आहेत. १५ ऑगस्टपासून हे पास वितरित होऊ लागताच लोकांनी त्यास चांगली पसंती दिल्याचे दिसत आहे. प्राधिकरणाच्या माहितीनुसार, अवघ्या आठ दिवसांत देशातील पाच लाखांहून अधिक फास्टॅग वार्षिक पास या योजनेतून सक्रिय झाले आहेत आणि त्यातून शासनाला अतिरिक्त (ॲडव्हान्समध्ये) १५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.