

Satara Girl Anuja Pawar Achieves Her Police Uniform Dream After Missing Mumbai Police Selection by Just Two Marks
esakal
सातारा : घरची शेती, आईचा गोठा सांभाळण्याचा कष्टाचा दिनक्रम आणि मनात पोलीस होण्याचे स्वप्न... या सगळ्यांच्या साथीने अनुजा दत्तात्रय पवार वय २१ हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घातली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या दोन गुणांनी मुंबई पोलीस शिपाई पदाची संधी हुकली; मात्र तिने हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न केला आणि अखेर १० ऑक्टोबर २०२६ रोजी तिच्या संघर्षाला यशाची किनार लाभली. पोलीस वर्दी परिधान करण्याचे स्वप्न साकार झाल्याने पवार कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.