Indian Army Soldier: देशसेवेचे व्रत अपुरेच राहिले! जावळीचा जवान तुषार भिलारेंची झुंज अपुरी ठरली, दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंब पोरके..

Pawarwadi Army jawan death news: देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या तुषार भिलारे यांच्या अकाली निधनाने दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंबावर आणि पवारवाडीसह पंचक्रोशीत शोककळा, गावात हळहळ व्यक्त
Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated

esakal

Updated on: 

आनेवाडी:देशसेवेचे व्रत हृदयाशी बाळगून भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे पवारवाडी (ता. जावळी) येथील सुपुत्र, जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय ३४) यांचे उपचारादरम्यान मंगळवारी (दि. ३०) दुःखद निधन झाले. सुट्टीवर गावी आले असताना झालेल्या अपघातानंतर गेल्या महिनाभरापासून ते पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. मात्र अखेर त्यांची ही झुंज अपुरी ठरली आणि देशसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या या जवानाची प्राणज्योत मालवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com