'वारकर्‍यांची धरपकड करणार्‍या दंडेलशाही सरकारचा निषेध'

Bandatatya Karadkar
Bandatatya Karadkaresakal

कऱ्हाड (सातारा) : बंडातात्या कऱ्हाडकर (Bandatatya Karadkar) यांची स्थानबद्धतेतून तातडीने सुटका करावी, या मागणीचे निवेदन देण्यास मोजकेच वारकरी एकत्र येवून जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) व जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Superintendent of Police Ajay Kumar Bansal) यांना निवेदन देणार होते. यासाठी वारकरी संप्रदायातील मंडळी एकत्र येणार होती. त्या परवानगीला पोलिसांना निवेदनही दिले होते. मात्र, आज पहाटे सकाळी 5 : 45 वाजता जवळवाडी येथील घरून विलासबाबा जवळ यांना मेढा पोलिसांनी (Medha Police) ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे. अनेक ठिकाणी सातारा जिल्ह्यातील वारकरी आणि युवकांची धरपकड सुरू झाली आहे. (Ashadhi Ekadashi Wari 2021 Vilasbaba Javal Criticizes Thackeray Government Satara Marathi News)

Summary

आषाढी पायी वारीसाठी राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आलीय.

आषाढी पायी वारीसाठी (Ashadhi Wari) राज्य सरकारने (Maharashtra Government) परवानगी नाकारली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आलीय. सरकारचा निर्णय नाकारुन बंडातात्या पायी वारीसाठी निघाले होते. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे बंडातात्यांनी आळंदीत जाहीर केले होते. त्यानुसार, शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तद्नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना सोडवण्यासाठी बंडातात्या तिथे पोहचल्यावर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना करवडीतील त्यांच्या श्रीकृष्ण गोपालन केंद्रात (Shrikrishna Gopalan Kendra) आणून सोडत स्थानबद्द केले आहे.

Bandatatya Karadkar
कोरोना नियमांचे उल्लंघन; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा

प्रशासनाच्या या दंडेलशाही सरकारचा व शांततेने निवेदन देण्यासाठी जाणार्‍या वारकर्‍यांची धरपकड करणार्‍या पोलिस प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो.

-विलास जवळ, राज्य अध्यक्ष व्यसनमुक्त युवक संघ

Ashadhi Ekadashi Wari 2021 Vilasbaba Javal Criticizes Thackeray Government Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com