

Sangam Mahuli Witnesses Last Rites of Ajitdada Amid Emotional Scenes
Sakal
सातारा: तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज (मंगळवारी) साताऱ्यात दाखल झाला. दूध संघाशेजारील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी विविध पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांनी भवनात येऊन अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दर्शन घेताना अनेकांना गहिवरून आले. दुपारनंतर संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णा संगमावर अस्थींचे विसर्जन करण्यात आले.