Ashish Shelar : चित्रीकरणासाठी नवे प्रोत्साहन धोरण आणणार: सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांची साताऱ्यात घोषणा
सातारा परिसर हा ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांसह निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. या भागात सिनेमा, मालिका यांचे चित्रीकरण सध्या केले जाते. भविष्यात या परिसराला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल.
Cultural Affairs Minister Ashish Shelar addressing the media in Satara regarding the upcoming film shooting incentive policy.Sakal
सातारा : सातारा जिल्हा आणि परिसर हा सिनेमा, विविध वाहिन्यांवरील मालिकांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत उत्तम डेस्टिनेशन आहे. त्यासाठी लवकरच एक धोरण तयार करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज येथे केली.