
मनोज पवार
दुधेबावी : राज्य सरकारमधील मंत्री वारंवार पोलिस भरतीची आश्वासने देत आहेत. त्यामुळे अनेक युवक गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भरतीची तयारी करत आहेत. असे असताना मंत्र्यांकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. मात्र, प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे रोज पहाटे उठून, घाम गाळून तयारी करणारे युवक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. आश्वासने वारंवार मिळताहेत. मात्र, प्रत्यक्ष पोलिस भरती कधी? असा सवाल फलटण तालुक्यातील युवकांमधून उपस्थित केला जात आहे.