
कऱ्हाड: मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद आणि साताऱ्याचे स्वतंत्र गॅझेट काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन स्वतंत्र गॅझेट काढणे म्हणजे मराठा समाजात फूट पाडण्यासारखेच आहे, असा आरोप करून मराठा समाजाच्या समन्वयकांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आज पत्रकार परिषदेत केले आहे.