
दहिवडी : बोडके (ता. माण) येथे किरकोळ कारणावरून युवकाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारास दहिवडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीच या गुन्ह्यातील सहा संशयितांना अटक करण्यात आली असून, दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.