Karad Crime : शेणोलीजवळ सिग्नलवर लाल फडके टाकुन प्रकार सह्याद्री एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; अज्ञात चौघाविरोधात गुन्हा

सिग्नलवर लाल फडके टाकुन कोल्हापुर-पुणे सह्याद्री स्पेशल एक्सप्रेस थांबवुन मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न कऱ्हाडजवळील शेणोलीजवळ (जि. सातारा) झाला.
kolhapur pune sahyadri express

kolhapur pune sahyadri express

sakal

Updated on

कऱ्हाड - सिग्नलवर लाल फडके टाकुन कोल्हापुर-पुणे सह्याद्री स्पेशल एक्सप्रेस थांबवुन मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न कऱ्हाडजवळील शेणोलीजवळ (जि.सातारा) झाला. रेल्वेच्या खिडकीतुन हात घालुन प्रवाशांचे सोन्याचे दागीने, मोबाईल दरोडेखोरांनी लंपास केला. याप्रकरणी मिना विकास उमापती (रा. मिरज) यांनी फिर्याद दिली असुन त्यावरुन मिरज रेल्वे पोलिसात चार अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगीतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com