कोपर्डे हवेलीत सिद्धनाथांचा शेतकरी अवतार; भाविकांचे वेधले लक्ष

जयंत पाटील
Sunday, 22 November 2020

कोपर्डे हवेली येथे आज रविवारी नांगर चालवणाऱ्या शेतकरी राजाच्या वेषात श्री सिध्दनाथ देवाची पूजा बांधण्यात आली.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील श्री सिध्दनाथ मंदिरात नवरत्न काळात पोषाखाव्दारे देवाला विविध रुप देऊन पूजा बांधण्यात येते. आज रविवारी नांगर चालवणाऱ्या शेतकरी राजाच्या वेषात श्री सिध्दनाथ देवाची पूजा बांधण्यात आली. 

भक्तीमय वातावरणात गावचे पुजारी महादेव गुरव, दत्तात्रय गुरव, कृष्णात गुरव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य नवरत्न काळातील बारा दिवस श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची विविध रुपातील आकर्षक पूजा बांधतात. १९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोशाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते. गावातील विद्युत क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व सर्व युवक, ज्येष्ठ मिळून हे विद्युत रोषणाईचे काम करतात. 

मारुतीच्या रुपात सिध्दनाथाचे दर्शन, हरपून गेले भाविकांचे मन!

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attractive Worship Of God Siddhanath At Koparde Haveli Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: