नारदमुनींच्या रुपात सिध्दनाथाचा अवतार; आकर्षक पूजेने वेधले लक्ष

जयंत पाटील
Friday, 20 November 2020

कोपर्डे हवेली येथील श्री सिध्दनाथ मंदिरात उपवासाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी नारदमुनींच्या रुपात सिध्दनाथाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील श्री सिध्दनाथ मंदिरात नवरत्नकाळात पोषाखाव्दारे देवाला विविध रुप देऊन पूजा बांधण्यात येते. उपवासाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी नारदमुनींच्या रुपात सिध्दनाथाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.  

भक्तीमय वातावरणात गावचे पुजारी महादेव गुरव, दत्तात्रय गुरव, कृष्णात गुरव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य नवरत्न काळातील बारा दिवस श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची विविध रुपातील आकर्षक पूजा बांधतात. १९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोशाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते. गावातील विद्युत क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व सर्व युवक, ज्येष्ठ मिळून ह्या विद्युत रोषणाईचे काम करतात. या रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघतो. 

साताऱ्याच्या वीरपुत्रास कुपवाडात 41 राष्ट्रीय रायफल्सकडून मानवंदना; महाडिकांच्या बलिदानास पाच वर्षे पूर्ण!

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attractive Worship Of Shri Siddhanath At Koparde Haveli Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: