
मलकापूर : येथील काँग्रेसचे माजी दोन नगरसेवक चुलते आणि पुतण्यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. येथील माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या चांदे चुलत्या- पुतण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना धक्का मानला जात आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिण व मलकापूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडले.