

Minister Jaykumar Gore inaugurates Varud reservoir and announces water project for 21 villages.
Sakal
औंध : औंधसह २१ गावांच्या पाणी योजनेला सर्व मंजुरी आणि मान्यता मिळाल्या आहेत. आता निविदा प्रक्रियेलाही लवकरच मान्यता मिळणार आहे. मी शब्द दिल्याप्रमाणे औंध पाणी योजना अडीच वर्षांत पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.