जाणून घ्या : सातारा जिल्ह्यातील काेविड 19 रुग्णांसाठीची उपलब्ध बेड संख्या

जाणून घ्या : सातारा जिल्ह्यातील काेविड 19 रुग्णांसाठीची उपलब्ध बेड संख्या

सातारा : सातारा जिल्ह्यात सद्यस्थिीत 154 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दाेन नागरिकांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत विविध रुग्णालयात 2663 पैकी 2178 बेड उपल्बध हाेते. तसेच काेराेना केअर सेंटर येथे 2728 पैकी 2547 बेडची उपलब्धता असल्याची माहिती आराेग्य विभागाच्या संकेतस्थळावर नूमद करण्यात आली आहे. 

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध उपाययाेजना आखल्या आहेत. ज्या भागात काेविड 19 चे रुग्ण तेथे सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केला जात आहे. मास्क न वापरणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दाेन दिवसांत सातारा तालुक्यात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे.

सातारा : वेळ आल्यावर व्याजासह हिशोब चुकता करीन; नगराध्यक्षांचे पवारांना प्रत्युत्तर

रविवारी रात्री जाहीर केलेल्या कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 3, म्हसवे 1, कोंढवे 1, कोडोली 1, पंताचा गोट 2,  व्यंकटपूरा पेठ 3, संभाजी नगर 1, राधिका रोड 1, सदर बझार 1,  शाहुनगर 1, मंगळवार पेठ 2, सोमवार पेठ 1, गोडोली 1, पिरवाडी संगमनगर 1, खेड 1,आरळे 1, संगमनगर 1, कण्हेर 1, मालगाव 1, मर्ढे 1, शिवथर 1. कराड तालुक्यातील शनिवार पेठ 2,  चरेगाव 1, वडगाव हवेली 1, पेरले 1, कोरीवळे 1, औंड 1, मलकापूर 1, बेलवडे बु 1, मसूर 1. पाटण तालुक्यातील पाटण 1,  कुंभारगाव 1, मुरुड 1, दिवशी बु 4. फलटण तालुक्यातील फलटण 1, मलठण 1,  लक्ष्मीनगर 2, वनदेवशेरी कोळकी 1, सजाई गार्डन 1, भडकमकरनगर 1, सांगवी 2, विढणी 2, वाठार निंबाळकर 1, गुणवरे 1, कोळकी 1, तरडगाव 12, नांदल 1,  खुंटे 1, भाडळी 1, पाडेगाव 1, खटाव तालुक्यातील खटाव 1, मोराळे 3, निढळ 1, नायकाचीवाडी 1, बनपुरी 1, वडूज 1, औंध 1, माण तालुक्यातील दानवळेवाडी 1, मलवडी 1,  दहिवडी 1, म्हसवड 5, पळशी 2, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, अपशिंगे 1, आर्वी 1,  पिंपोडे बु 1, वाठार स्टेशन 1. खंडाळा तालुक्यातील खंडाळा 3, लोणंद 6, लोणी 1, आसावली 1,पारगाव 1, पारगाव खंडाळा  1, कानूर 1, रविवार पेठ 1, बावधन 1, पसरणी 1, पांडेवाडी 2,एकसर 1. महाबळेश्वर तालुक्यातील हारोशी 3, कुरोशी 1. जावली तालुक्यातील डोंगरेघर 1, केंजळ 1, माठे 3, रांगणेघर 1. 
इतर 2 बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव (सांगली) 1. बाहेरील राज्यातील पश्चिम बंगाल 1.

दाेन बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये शनिवार पेठ, ता.सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, कर्वे नाका, ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष या दाेन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने - 372042

एकूण बाधित  - 60885 

घरी सोडण्यात आलेले - 57113

मृत्यू -1873

एकूण उपचारार्थ रुग्ण -1899

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com