Satara Rain : दिलासा नाहीच! पश्चिमेकडे उघडीप, पूर्व भाग दुष्काळाच्या छायेत; जिल्ह्यात 76 टक्केच पाऊस

पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण चांगले असले तरी जोर कमीच
Rain News
Rain NewsSakal
Summary

प्रमुख सहा धरणांत १०९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे.

सातारा : जिल्ह्यात सध्या पावसाने (Satara Rain) उघडीप दिली असली, तरी अद्यापपर्यंत तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. पूर्वेकडील तालुके तर दुष्काळाच्या छायेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ७६.१ टक्केच पाऊस झाला आहे.

तर, प्रमुख सहा धरणांत १०९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे, तरच विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असून, पूर्व भागात अल्पप्रमाणात पाऊस झाला आहे.

Rain News
Eknath Shinde : CM शिंदे हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे रवाना झाले, पण मध्येच असं नेमकं काय घडलं की त्यांना..

तर, पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण चांगले असले तरी त्यामध्ये जोर नाही. त्यामुळे आतापर्यंत सरासरीच्या केवळ ७६.१ टक्केच पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या १०३ टक्के पाऊस झाला होता. आता पावसाने उघडीप दिली असली तरी अधूनमधून तुरळक सरी येत आहेत.

सध्या खरीप पिके चांगल्या स्थितीत आहेत. या पिकांना आणखी पावसाची गरज आहे. जून, जुलैमध्ये ३९० मिलिमीटर पाऊस झाला होता. गेल्या तीन महिन्यांत ४३६.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी : सातारा ४५७, जावळी ८११, पाटण ८५९, कऱ्हाड २४२, कोरेगाव १९४, खटाव १४७, माण ११८, फलटण ८९, खंडाळा १३४, वाई ३२८, महाबळेश्‍वर २३१८. या सर्वांची सरासरी ७६.१ टक्के आहे.

Rain News
Raju Shetti : वादळ पेल्याबाहेर गेलं तर स्वाभिमानीसह तुपकरांना बसणार मोठा फटका; राजू शेट्टींच्या भूमिकेकडं लक्ष

जिल्ह्याच्या पूर्व भागात तुरळक पाऊस असल्याने येथे पाणी टंचाई जाणवत आहे. परिणामी, टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे, तर अल्प पावसामुळे चाऱ्याची टंचाई आगामी काळात भासण्याची शक्यता असल्याने दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवसांपर्यंत १०३ टक्के पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत १०९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

Rain News
Sindhudurg : 'राजकारण्यांनीच आमचो सत्यनास केलो'; हत्ती हटाओसाठी शेतकरी आक्रमक, मंत्री केसरकरांनी दिलं 'हे' आश्वासन

धरणांची स्थिती

धरणाचे नाव - उपलब्ध पाण्याची टक्केवारी

  • कोयना - ७८.७०,

  • धोम - ८२.९८

  • धोम - बलकवडी ८७.३७

  • कण्हेर - ७७.३७

  • उरमोडी - ६२.२८

  • तारळी - ८५.४५.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com