कोंडव्यातला ऐतिहासिक रामकुंड नामशेष होण्याच्या मार्गावर?

राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या कोंडवे गावाचा सातारा तालुक्‍याच्या राजकारणात स्वतंत्रपणे दबदबा आहे.
Ramkunda
Ramkundaesakal

सैदापूर (सातारा) : कोंडवेसह पंचक्रोशीतील युवकांचे पोहण्याचा हक्काचा असणारा रामकुंड देखभाल-दुरुस्ती आणि इतर कारणांमुळे भग्नावस्थेला पोचला आहे. रस्ता रुंदीकरण व इतर कारणांमुळे आगामी काळात कोंडवेकरांच्या जीवनाचा भाग बनून राहिलेल्या रामकुंडचे नामोनिशाण नकाशावरून पुसले जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात त्याचे अस्तित्व पूर्णपणे संपणार आहे.

राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या कोंडवे गावाचा सातारा तालुक्‍याच्या राजकारणात स्वतंत्रपणे दबदबा आहे. राजकारणाबरोबरच सैनिकी सेवेतदेखील कोंडवे गावाने आपला ठसा उमटवला आहे. शेती, दूध व त्याला जोडून असणाऱ्या व्यवसाय, नोकऱ्यांवर या ठिकाणचे अर्थकारण अवलंबून आहे. या गावालगत अनेक जुन्या वास्तू असून त्यामध्ये रामकुंडचा समावेश आहे. कधी काळी या रामकुंडातील पाण्यावर आजूबाजूची शेती फुलत होती आणि बागा डोलत होत्या. बांधीव रामकुंडात बारमाही पाण्याचा साठा असायचा. त्यामुळे उन्हाळ्यात या ठिकाणी पोहण्यासाठी कोंडवेसह पंचक्रोशीतील युवकांची मोठी गर्दी असायची.

गावातील लहान-मोठ्यांना पोहता आलेच पाहिजे, असा या गावाचा शिरस्ता. यामुळे या ठिकाणी लहान-थोरांना आणत जाणती माणसे त्यांना पाण्यावर हात मारण्याचे धडे द्यायचे. त्यातूनच या ठिकाणी "डॉल्फीन क्‍लब'ची स्थापना करण्यात आली. या क्‍लबमुळे कोंडवेच्या नावलौकिकात भरच पडली आणि शेकडो जण पोहण्यात तरबेज बनले. या क्‍लबमुळे अनेक जण पाण्यावर हात मारत सहजासहजी एैलतीर पैलतीर गाठू लागले. गेली अनेक वर्षे रामकुंड कोंडवेकरांचा उन्हाळ्यातील मध्यबिंदू बनून राहिला होता. काळाच्या ओघात या रामकुंडच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आणि त्याच्या दुरवस्थेला सुरुवात झाली. सध्या हा रामकुंड अखेरच्या घटका मोजत असून सुरू असणाऱ्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात त्याचे अस्तित्व पूर्णपणे संपणार आहे. या रामकुंडचे अस्तित्व जपण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Edited By : Balkrishna Madhale

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com