esakal | बावधननंतर पांडेत होणार 'बगाड'; यात्रास्थळी चोख पोलिस बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Bagad Yatra

बावधननंतर पांडेत होणार 'बगाड'; यात्रास्थळी चोख पोलिस बंदोबस्त

sakal_logo
By
विलास साळुंखे

भुईंज (सातारा) : पांडे (ता. वाई) येथे पोलिस व प्रशासनाच्या नियंत्रणाखाली उद्या (बुधवारी) होणाऱ्या बगाड व यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आल्याची माहिती भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली.

गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा 28 व 29 एप्रिल रोजी होत आहे, या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पांडे परिसरात कडक संचारबंदी, जमावबंदी आदेश दिले असून, आज दुपारीपासूनच पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

लईभारी! हस्तनपुरातील खडकाळ माळरानात बहरतेय वनराई; 31 हजार 250 वृक्षांना 'जीवदान'

ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करून घरातच राहून धार्मिक विधी व दर्शन घ्यावे. रस्त्यावर कोणीही येऊ नये, असे आवाहन सरपंच रेखा जाधव, उपसरपंच मंगल उंबरकर, माजी सरपंच किरण जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भरत गोळे, पोलिस पाटील विश्वजित चव्हाण, संजय थोरात, जितेंद्र जाधव, सुनील उंबरकर यांनी केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

loading image