बाळासाहेब भिलारे स्ट्रॉबेरीचे विद्यापीठ होते : शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब भिलारे स्ट्रॉबेरीचे विद्यापीठ होते : शरद पवार

बाळासाहेब भिलारे स्ट्रॉबेरीचे विद्यापीठ होते : शरद पवार

सातारा (भिलार) : स्व.बाळासाहेब भिलारे हे महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरीचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारण आणि कृषी क्षेत्रात मोठी उणीव निर्माण झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

श्री. पवार येथे बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. किंगबेरी येथे बाळासाहेब भिलारे यांच्या प्रतिमेला शरद पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, ‘‘बाळासाहेबांनी स्ट्रॉबेरी सर्वदूर पोचवली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचवताना नवनवीन स्ट्रॉबेरीच्या जाती त्यांनी परदेशातून आणून लोकांना पुरवल्या. उत्पादित मालाला परदेशी बाजारपेठ उपलब्ध करताना ठिकठिकाणी स्ट्रॉबेरी महोत्सव भरवत पर्यटकांकडून तिला राष्ट्रीय पातळीवरील दर्जा मिळवून दिला.’’

हेही वाचा: ST Strike: "कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करु"

या वेळी सभापती संजूबाबा गायकवाड यांनी सुरूर ते महाड मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी केली. या वेळी श्री. पवार यांनी याचा प्रस्ताव तातडीने द्यावा, असे मकरंद पाटील यांना सांगितले. या वेळी नितीन भिलारे, जतिन भिलारे व तेजस्विनी भिलारे, भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे, प्रवीण भिलारे, किसन भिलारे, पारटे, सुधीर भिलारे, सुनील भिलारे, राजेंद्र भिलारे, अमोल भिलारे, शशिकांत भिलारे आदी उपस्थित होते. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही भिलार येथे स्व. बाळासाहेब भिलारे यांना आदरांजली वाहिली.

loading image
go to top