
कऱ्हाड : विधानसभेच्या निवडणुकीनंतर विनाकारण कारखान्याच्या बाबतीत विरोधक अफवा पसरविण्याचे षडयंत्र रचून सभासदांच्या भावना भडकविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. सह्याद्री कारखाना महाराष्ट्रात ऊसदराच्या बाबतीत अव्वल स्थानावर असल्यामुळे आजूबाजूच्या खासगी कारखानदाराचे नुकसान होत आहे. म्हणून खासगी कारखानदार सभासदांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडे वाकड्या नजरेने पाहात आहेत. सभासद त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.