सातारा : बाबासाहेबांच्या विचारांना छेद देण्याचा प्रयत्न : बाळासाहेब पाटील

सर्वधर्मसमभावाच्या विचाराने पुढे जाण्याची देशाला गरज असुन त्या विचाराने आपण मार्गक्रमण करावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
Balasaheb Patil challenge to move on Sarva Dharma Sama Bhava Babasaheb ambedkar thoughts satara
Balasaheb Patil challenge to move on Sarva Dharma Sama Bhava Babasaheb ambedkar thoughts satarasakal media

कऱ्हाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहली त्यास अभिप्रेत कारभार देशामध्ये सुरू ठेवुन सामंजस्याचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु काही लोक या विचारांना छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वधर्मसमभावाच्या विचाराने पुढे जाण्याची देशाला गरज असुन त्या विचाराने आपण मार्गक्रमण करावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मंत्री पाटील बोलत होते. पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, पालिकेतील विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, गंगाधर जाधव, सादिक इनामदार, शिवाजी पवार, सुहास पवार, रविंद्र मुंढेकर, अख्तर आंबेकरी, अमोल सोनवले, भारत थोरवडे, मंगेश वास्के, राहुल भोसले, सोहेब सुतार, सतीश भोंगाळे, सचिन चव्हाण, अजय सूर्यवंशी, रत्नाकर कांबळे तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती देशभरात आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश लोकशाही मार्गाने पुढे गेला पाहिजे यासाठी राज्यघटना तयार करण्यात आली. याचे सर्व काम डॉ. आंबेडकर यांनी केले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार करुन 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अंमलात आली. तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आज हा देश सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन पुढे जात आहे. हे करत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहली, त्यास अभिप्रेत असा कारभार देशामध्ये सुरू ठेऊन सामंजस्य वातावरण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु काही लोक या विचारांना छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वधर्मसमभाव विचाराने पुढे जाण्याची या देशाला गरज असुन त्या विचाराने आपण मार्गक्रमण केले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com