
मसूर : यापूर्वी तारगाव फाटा हा अपघाती व विविध घटनांचा केंद्रबिंदू बनला होता. मात्र हा धोकादायक चौक आता व्यावसायिक व मंदिराचे केंद्र बनला आहे. त्यामुळे या चौकाची शोमा अधिक वाढली आहे. गेली २५ वर्षे आपण संधी दिल्याने मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले. यापुढेही न डगमगता संघटित राहून आपण मतदार संघाच्या विकास कामांना प्राधान्य देऊ, अशी ग्वाही माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.