Karad News : बाळासाहेब पाटलांनी जिंकली न्यायलयीन लढाई; 62 कोटींच्या कामावरील स्थगिती उठवली

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार बाळासाहेब पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी ७९ कोटींची विकास कामे मंजूर केली.
MLA Balasaheb Patil
MLA Balasaheb PatilSakal

कऱ्हाड - महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार बाळासाहेब पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी ७९ कोटींची विकास कामे मंजूर केली. या कामांना सध्याच्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यातील काही कामांवरी स्थगिती उठवण्यात आली.

मात्र ६२ कोटींच्या कामावर स्थगिती होती. त्यावर आमदार पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्या कामांवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे ६२ कोटी रुपयांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामध्ये उत्तरमधील विकास कामांसह शहरातीलही कामांचा समावेश आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार पाटील यांनी ७९ कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली होती. या कामांना सध्याच्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यामुळे या कामाबाबत आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकेनंतर उच्च न्यायालयाने या १७ कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती उठवली. उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर २५१५ इतर ग्रामीण विकास योजनेअंतर्गत आठ कोटी, बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणे योजनेअंतर्गत एक कोटी आठ लाख, रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रमांतर्गत एक कोटी १० लाख, जलसंधारण महामंडळाकडील छोटे सिंचन बंधारे योजनेअंतर्गत चार कोटी ही विकासकामे सुरू झाली.

मात्र अल्पसंख्यांक बहुल विकास योजना, अर्थसंकल्प योजना मार्च २०२२, जलसंधारण महामंडळाकडील मोठे साठवण बंधारे व वैशिष्ट्यपूर्ण योजना नगर विकास विभाग आदींच्या कामांवरील स्थगिती होती. ती स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे ६२ कोटी रुपयांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यामध्ये रस्ता, बंधारे, संरक्षक भिंत, शेड बांधणे, ओपन जीम, ओपन गटर्स, आरसीसी गटर्स, अभ्यासिका, कृष्णा पूल परिसर सुशोभिकरण करुन वॉकींग ट्रॅक तयार करणे, बगीचा विकसीत करणे आदी कामांचा समावेश असून सदर कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होवून, कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरीकांतुन समाधान व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com