दहा जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात; भाजप सरचिटणीसांच्या मतांवर मातब्बरांचा डोळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Bhosale

बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडी वेगात सुरू आहेत.

Election 2021 : दहा जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. बॅंकेच्या कऱ्हाड सोसायटी (Karad Society) गटातून दस्तुरखुद्द सहकारमंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) या दोघांचे लढत होत आहे. नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. या गटातील विजयासाठी भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले (BJP General Secretary Atul Bhosale) यांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यांच्या मतांवर पालकमंत्री व उंडाळकरांचा डोळा आहे. त्यामुळे त्यांची मते कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता लागून आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडी वेगात सुरू आहेत. यावेळच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच पक्ष सक्रिय झाले होते. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा बॅंकेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी व्यूहरचना आखल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना विचारात घेऊन जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्याला पूर्णपणे यश आले नाही. इच्छुकांची संख्या वाढल्याने जिल्हा बॅंकेच्या २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरित दहा जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्यासाठी २० मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी नेत्यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. राज्याचे सहकार खाते ताब्यात असलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही सोसायटी गटातूनच शड्डू ठोकला आहे. त्यांनी चांगलीच तयारी केली असून, त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकाही होऊन मतदारांच्या संपर्कासाठी त्यांनी काम सुरू आहे.

हेही वाचा: प्रभाकर घार्गेंची बंडखोरी राष्ट्रवादीला महागात पडणार?

दरम्यान, जिल्हा बॅँकेची घडी बसवून ती बॅँक नावारूपास आणलेले माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे मध्यंतरी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार अॅड. उदयसिंह उंडाळकर यांनीही उंडाळकरांनी यापूर्वी नेतृत्व केलेल्या सोसायटी गटातूनच निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यासाठीची व्यूहरचनाही रयत संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. उमेदवारीसाठी यापूर्वी त्यांनी दोन वेळा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. जिल्हा बॅंकेसाठीच्या सोसायटी गटात १४० मते आहेत. त्यातील जास्तीतजास्त मते आपल्याकडे असल्याचा दावा सहकारमंत्री पाटील व अॅड. उंडाळकर यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहेत. मात्र, थेट आकडेवारी सांगितली जात नाही. नुकत्याच झालेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्याने भोसले गट चांगलाच ‘चार्ज’ झाला आहे. भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांच्या गटाकडेही सोसायटी मतदार संघातील मते आहेत. त्यामुळे त्यांच्या गटाचीही मते निर्णायक ठरणार आहेत. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचाही त्यांच्या गटाच्या मतांना संदर्भ असणार आहे. त्यामुळे त्यांच्या गटाच्या मतांना मोठी किंमत आली आहे. त्यांच्या गटाची मते कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Big Fight : कऱ्हाड सोसायटीत काँग्रेस-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

मतदारांना मोठी किंमत

सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, तरीही दहा जागांची निवडणूक लागली आहे. त्यात कऱ्हाड सोसायटी गटाची निवडणूक चुरशीची होत आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी मोठी किंमत आली आहे.

हेही वाचा: 'निवडणूक कठीण आहे, तुझं काही खरं नाही; पण मी चौथ्यांदा..'

loading image
go to top