Big Fight : सेनेच्या गृहराज्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान; प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाची बाजी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

गृहराज्यमंत्री देसाई व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Big Fight : सेनेच्या गृहराज्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

पाटण (सातारा) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिष्ठेची केलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Satara Bank Election) आज पाटण तालुक्यातील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल (Dnyanojirao Salunkhe High School) येथे शांततेत व उत्साहात मतदान सुरू झाले आहे.

सोसायटी मतदार संघातून उमेदवार असणारे गृहराज्यमंत्री देसाई व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर (NCP leader Satyajitsingh Patankar) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पोलिस बंदोबस्तात सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झालीय. साडे नऊच्या सुमारास सत्यजितसिंह पाटणकर टूरवर गेलेल्या मतदारांसह मतदान केंद्रावर दाखल झाले. साडे दहाच्या सुमारास मंत्री देसाई समर्थकांसह दाखल झाले आणि मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

हेही वाचा: 'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

Satara Bank Election

Satara Bank Election

मतदान केंद्राचे परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक निग्रज चौखंडे, मल्हारपेठचे उत्तम भापकर, कोयनानगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार व मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा: 'आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळाबर लढणार'

loading image
go to top