दुसऱ्यासाठी खड्डा खोदल्यावर आपणीही खड्ड्यात पडतो; शिंदेंच्या पराभवावर भाजप नेत्याची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Patil

आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणेंचा एक मतानं विजय झाल्यानं आमदार शशिकांत शिंदेंना पराभवाचा मोठा धक्का बसलाय.

दुसऱ्यासाठी खड्डा खोदल्यावर आपणीही खड्ड्यात पडतो; भाजप नेत्याची टीका

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे जरी माझे सहकारी असले, तरी प्रत्यक्षात निवडणुकीत काय घडलं हे मला माहित नाही. मी प्रचाराला देखील गेलो नाही. पण, जेव्हा दुसऱ्यासाठी आपण खड्डा खोदतो, तेव्हा आपणही कधी ना कधी त्या खड्ड्यात पडतो, असा टोला भाजप नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना लगावला.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या येथील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी श्री. पाटील आले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिंदे यांनी जावळी सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांच्याविरोधात ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) हे अवघ्या एका मताने विजयी झाले. त्यानंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यालय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी फोडले होते.

हेही वाचा: अजित पवारांकडून उमेदवारी घेतली खरी; पण निष्ठावंत घार्गेच ठरले भारी

अनपेक्षित पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. या प्रकरणावर विचारले असता नरेंद्र पाटील म्हणाले, शशिकांत शिंदे हे जरी माझे सहकारी असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीत काय घडलं हे मला माहित नाही. मी प्रचाराला देखील गेलो नाही. पण, जेव्हा दुसऱ्यासाठी आपण खड्डा खोदतो तेव्हा आपणही कधी ना कधी त्या खड्ड्यात पडत असतो, त्यामुळं खड्डा खोदतानाच आधी विचार करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा: 'शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार'

loading image
go to top